‘मायनर डिटेल्स’ : पॅलेस्टिनी लोकांची स्वतःच्याच देशात झालेली विचित्र स्थिती सांगणारी छोटेखानी कादंबरी
पॅलेस्टाईनवर दुसऱ्या लोकसमूहाने वसाहतीकरण केले. मूळ लोक विस्थापित झाले. त्यांचे नामोनिशाण राहिलेले नाही. ते देशोधडीला लागले. विविध संस्था, त्यांना पर्यायी जागा दिल्याचे सांगतात. ही माणसे अभावग्रस्त असतात. त्यांना रोजच्या जगण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पण तेथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे सगळे मुबलक असते. ही विषमता आणि भारतातील प्रकल्पग्रस्तांचे विस्थापित होणे सारखे आहे.......